तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। अळूवडी हि जवळपास सगळ्यांनाच आवडते. घरात अळूची भाजी सुद्धा केली जाते. अळूवडी ही घरी करून पहायला सोप्पी आहे. तर अळूवडी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
अळूची पाने,बेसन, पांढरे तीळ, कढीपत्ता,लाल तिखट, कोथिंबीर,ओलं खोबरं, जिरे, हळद, हिंग, तेल, मीठ.
कृती
सर्वप्रथम बेसनात जिरे, तीळ, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता टाकावा त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण घट्ट भिजवून घ्या.अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या. पानाच्या मागील भागावर हे मिश्रण टाका. त्यावर दुसरे पान उलटे ठेवा आणि हे मिश्रण हाताने नीट पसरून घ्या. अशाप्रकारे एकावर एक पानांवर मिश्रण लावा आणि हे चारही पाने दुमडून रोल करा. रोल करताना सुद्धा मिश्रण लावा. कूकरचे भांडे घ्या त्या भांड्याला नीट तेल लावा आणि हा रोल १० -१५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. कुकरमधून बाहेर काढल्यानंतर या रोलचे छोटे छोटे काप करावेत आणि हे काप गरम तेलातून तळून घ्यावे.