अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सरकारी बँकांमध्ये ‘लिपिक’ पदाच्या तब्बल ४०४५ जागांवर भरती

तुम्ही जर पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. IBPS अंतर्गत लिपिक पदांसाठी जागा निघालेल्या आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीच्या माध्यमातून तब्बल ४०४५ जागा भरल्या जाणार असून  इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ आहे. तर महाराष्ट्र राज्यात जवळपास ५२७ पदांसाठी जागा आहेत.

अर्ज करण्यासाठी किंवा नोकरीस पात्र ठरण्यासाठीची किमान वयोमर्यादा २० वर्षे ते २८ वर्षे इतकी आहे.

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

किती फी लागेल?

अर्ज करण्यासाठी SC/ST/PwBD रु.१७५/- GEN/OBC/EWS रु. ८५०/- इतकी फी असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असेल.

अर्ज प्रक्रिया
१. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
२. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
३. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
४. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online