अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेय फडणवीस ?
‘मी तर हे तुमच्याकडून ऐकलं आहे. मी एवढचं सांगेन की, काँग्रेसमधले अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात आहेत, गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय’, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळलेले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या! असंही ते म्हणालेत.