असोद्याच्या प्राध्यापकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात काय म्हटलंय?

जळगाव : असोदा येथील प्रा.उमेश वाणी यांनी गावास ग्रामपंचायत ऐवजी नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. प्रा. वाणी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना याबाबतचे निवेदन इमेल केले आहे.

काय मागणी केलीय प्रा.वाणी? 

 

मा. एकनाथजी शिंदे,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,

आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, जळगांव जिल्ह्यातील व जळगांव तालुक्यातील असोदा (पिन कोड क्र.४२५१०१) हे गाव जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगांव शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असून पस्तीस हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव आहे. गावातील वाढती लोकसंख्या आणि गावावर होणारा शहरीकरणाचा परीणाम, रस्ते, पाणीपुरवठा, क्रीडांगण, मनोरंजन सुविधा, कर वसुली, कचरा व्यवस्थापन इत्यादी समस्येमुळे गावकरी त्रस्त आहेत. सुविधांच्या अभावामुळे नागरीक शहराकडे विस्थापित होत आहेत.

असोदा गाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असून गावात बहिणाबाईचे शासकीय खर्चातून मोठे स्मारक आकारास येत आहे.

असोदा गावातील समस्यांचा विचार करुन आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता आपण असोदा (पिन कोड क्र‌. ४२५१०१) गावास तात्काळ प्रभावाने नगरपरिषदेचा दर्जा द्यावा ही विनंती.

आपलाच हितचिंतक

प्रा. उमेश वाणी, असोदा.