सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी, या पर्वतावर येणाऱ्या भाविकांसाठी मुलभूत सुवीधा उपलब्ध नाही. यामुळे या अडचणींचा भाविकांना सामना करावा लागत आहे. मात्र सप्तशृंगी गडाप्रमाणे आता सातपुड्यातील अस्तंबा तीर्थक्षेत्राचा विकास होणार आहे.
आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नानाने पर्यटन विभागाकडून ५ कोटींच्या विकास कामांना मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार पाडवी यांनी दिलीय. नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा या गावात असलेल्या सातपुड्यातील सर्वोच्च शिखरावर महाभारताच्या वेळेस ध्यान करण्यासाठी आले. त्यानंतर ते या स्थानावरून अजरामर झाल्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात.
दरवर्षी धनत्रयोदशीला त्यांच्या नावाने मोठी यात्रा भरत असते आणि लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत असतात. मात्र पर्यटन विभागच्या दुर्लक्षामुळे अस्तंबा ऋषी पर्वताचा विकास झालेला नाही. ही गोष्ट लक्षात घेत भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी पर्यटन विभागाकडे या संदर्भातील पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना उष्ण आले असून, भाविकांसाठी सोय होणार आहे.