तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। नागपूर मधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली पीडितेच्या लहान बहिणीवरही आरोपीने वाईट नजर ठेवली. नंतर एक दिवस मुलगी तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली आणि पोलिस ठाण्यात पोहोचली तेव्हा हे संपुर्ण प्रकरण उघडकीस आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तरूणीच्या आईचे कळमना येथील आरोपीशी प्रेमसंबंध होते यामुळे आरोपी अनेकदा तिच्या घरी दारू पिऊन महिलेच्या घरी राहायचा. दारूच्या नशेत आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी घरातून निघून गेल्यावर पीडितेने तिच्या आईला याबाबत माहिती दिली असता तिने मुलीला शांत राहण्यास सांगितलं.
दरम्यान आरोपीने पीडितेला अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच आरोपीने तिच्या १४ वर्षांच्या लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेचा लक्षात आले. हे पीडित मुलीला सहन न झाल्याने तिने आरोपीशी हुज्जत घातली आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपी काही दिवस शांत राहिला त्यानंतर त्याने तिला फोनवर शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतरच पीडिता तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिच्या आईला अटक केली असून आरोपी रोहित चौरेचा शोध सुरू आहे.