आई-वडील शेतात अन् भाऊ दुकानात, तरुणीनं घेतला धक्कादायक निर्णय; जळगावातील घटना

जळगाव :  लहान भावाला दुकानात पाठवून १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जातेय. शहरातील विठ्ठलपेठ परिसरात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रानुसार, शहरातील विठ्ठलपेठ परिसरात ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होती. शहरातील का.ऊखाजी कोल्हे येथे ती अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान आज शुक्रवार, 13 रोजी सकाळी तिची आई या नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेले होत्या, तर वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते.

त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते. थोड्यावेळाने लहान भाऊ दीपक घरी आल्यावर बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने आरडाओरड करत नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलवले. शेजारी राहणाऱ्यांनी तिला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी यांनी घोषित केले.

दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत क्षणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याची नेमके कारण समोर जरी स्पष्ट झालेले नसले, तरी ती गेल्या काही दिवसांपासून होती. हे मात्र स्पष्ट झाले आहे. तिच्या पश्चात वडील सुरेश चौधरी, आई अर्चना, लहान भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे.