जळगाव । राज्यातील अनेक शहरातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर लोकांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्ट्यांचा आधार घ्यावा लागत आहे
जळगावातील तापमान बुधवारी किमान तापमान ९ अंश तर कमाल २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आगामी चार पाच दिवसात मात्र तापमानात वाढ दिसून येईल. जळगावात दिवसाही हवेत गारवा जावणत असल्यामुळे हुडहुडी पसरली आहे. पहाटे धुक्याची चादर पसरलेली दिसून येते. सध्याच्या बोचऱ्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी झाली असून वाऱ्यांमुळे नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
जळगावात आगामी पाच दिवस असे राहणार तापमान?
दरम्यान, आज जानेवारी तापमानाचा पारा ९ अंशावर राहील. तर २६ जानेवारी वाढ होऊन १० अंशावर जाऊ शकते. २७ जानेवारीला पुन्हा घसरण होऊन ९ अंशावर येईल. २८ जानेवारीला पुन्हा वाढ होऊन १० अंश तर २९ जानेवारीला ११ सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे.