---Advertisement---

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २४ सप्टेंबर २०२३। दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास 
व्यापार चांगला चालेल.भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल.  आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. मान-सन्मानाचे योग मिळेल.

वृषभ रास 
सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षेत भाग घ्यावा यश निश्चित मिळेल.

मिथुन रास 
आर्थिक टंचाई निर्माण होतील. मन कामात लागणार नाही. घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका.

कर्क रास 
मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. आपल्या कामाची स्तुती होईल. मानसन्मान वाढीस लागेल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

सिंह रास 
रोजगारात बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दयावे. व्यसनापासुन दुर रहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या रास 
नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील.

तूळ रास 
नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे.

वृश्चिक रास 
जास्त उत्साह दाखविल्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. भांवडाकडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित सामान्य कामासाठी दिवस चांगला राहणार आहे.

धनु रास 
आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. अप्रिय बातमी ऐकण्यास मिळु शकते.

मकर रास 
व्यापार रोजगारात लग्न स्थानातील भ्रमणामुळे अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत.  मौजमजा करण्याकडे कल राहिल. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ रास 
घरात एखादयाशी मतभेद निर्माण होतील.  पत्नीसोबत वाद घालू नका. पत्नीच्या सहकार्याने काही योजनावर कार्य सुरु कराल. आर्थिक परिस्थितीत प्रयत्नाने सुधारणा होऊ शकते.

मीन रास 
नोकरीत वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. विचाराअंतीच निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment