आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना आजचा दिवस आनंदाचा

तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील.  व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल.

वृषभ रास
दुसऱ्यावर अति विश्वास ठेवू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे.

मिथुन रास
वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका.

कर्क रास
कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.

सिंह रास
नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. आपल्या हातून चांगले कार्य कार्य घडेल. एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायद्याची जाणवेल.

कन्या रास
आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल. शक्यतो प्रवास टाळा.  दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

तूळ रास
व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे.  आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक रास
रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील.  आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.

धनु रास
घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. कौटुंबिक जीवन सुखी राहील.

मकर रास
आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात गुंतवणुक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाचा संधी मिळेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील.

कुंभ रास
व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे.  अतिरिक्त कामानुन उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाईगडबड करू नका.

मीन रास
नव्या योजना कार्यान्वित करु शकाल.  राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल. विद्वान लोक भेटतील. कौटुंबिक समाधानन लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.