---Advertisement---

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यकारक घटनांचा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ९ सप्टेंबर २०२३। दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल.

वृषभ रास
कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या.

मिथुन रास
मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आरोग्य उत्तम राहिल. कुटुंबात मंगल कार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल.

कर्क रास
अनैतिकता वाढीस लागेल.  मनात सदैव नकारात्मकता राहण्याची शक्यता आहे. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करावेत.

सिंह रास
ध्येय निश्चित करा. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील.पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.

कन्या रास
स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. प्रवास लाभदायक होतील.

तूळ रास
व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.  मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे.

वृश्चिक रास
प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे.

धनु रास
नवीन योजना आखल्या जातील. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. मनोबल उत्तम राहील. अचानक लाभ होईल.

मकर रास
भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल.बढतीची संधी आहे.आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल.  आजचे दिनमान सफलतादायक आहे.

कुंभ रास
मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. अनावश्यक कामात वेळ वाया घालूनका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल.

मीन रास
वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लागेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---