तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील.
वृषभ रास
जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. प्रगतीकारक दिनमान आहे. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत.
मिथुन रास
शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना दुखवू नका.
कर्क रास
फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. लाभदायक दिनमान असेल.
सिंह रास
आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. दिनमान उत्तम राहिल.
कन्या रास
कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल.
तूळ रास
शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल. प्रवास सुखकर होईल.
वृश्चिक रास
कुटुंबात मनमानी करू नका. कुटुबांतील सदस्याच्या आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा.
धनु रास
प्रवासातून लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील.
मकर रास
पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल.
कुंभ रास
मानसिक संतुलन ठेवा. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवा. पत्नीच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.
मीन रास
आज कर्ज घेणे टाळा. व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये. कर्जप्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावेत.