आजपासून नागपूर-पुणे एकेरी विशेष गाडी धावणार, ‘या’ स्थानकांवर थांबे घेईल?

भुसावळ । सध्या रेल्वेत परतीच्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जात आहे. अशातच दिवाळी संपल्यानंतर पुण्याकडे परतणाऱ्या हजारो प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर पुणे एकेरी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून ही गाडी आज म्हणजेच १९ नोव्हेंबर पासून धावणार आहे. ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे सुपरफास्ट स्पेशल क्रमांक 01166 ही गाडी रविवारी रात्री 21.30 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 14.40 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला एकूण २२ कोच असतील. त्यात ११ कोच एसी टू टियर, ९ कोच एसी थ्री टियर आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश राहणार आहे.

या स्थानकांवर राहील थांबा
गाडी अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, अहमदनगर, बेलापूर, दौंड येथे थांबे घेईल.

दरम्यान, दिवाळी संपल्यानंतर अनेक जण कुटुंबासह परतीचा प्रवास करत आहे. मात्र यादरम्यान, रेल्वेसह, बसेससह खासगी ट्रॅव्हल्समध्ये गर्दी दिसून येत आहे. भुसावळ, जळगाव हुन पुण्याला जाण्यासाठी मोजकेच रेल्वे गाड्या धावत असल्याने प्रवाशांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यात खासगी ट्रॅव्हल्सवाले अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याने आर्थिक बोजा सहन करावा लागतोय.