तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. या दरम्यान आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे आणि मुंबई या शहरांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार राज्यात एक ऑक्टोबर पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर दोन ऑक्टोबरला राज्यात ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.