IPL २०२३ : आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण? धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडू याने निवृत्तीची घोषणा केली आहे. अंबाती रायडू याने ट्वीट करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
मुंबई आणि चेन्नई या दोन संघाचा भाग होण्याची संधी मिळाली. 14 हंगाम 204 सामने, 11 प्लेऑफ, 8 फायनल आणि पाच आयपीएल चषके… आज सहावा चषक जिंकू अशी आशा आहे. आज रात्री होणारी सामना माझ्या आयपीएल” आयपीएल करिअरचा अखेरचा सामना असेल. सर्वांचे आभार.. अशी इमोशनल पोस्ट रायडूने केली आहे.