आज देवशयनी एकादशी, राशीनुसार करा ‘या’ मंत्राचा जप

तरुण भारत लाईव्ह । २९ जून २०२३ । देवशयनी एकादशी आज २९ जून रोजी आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात मानली जाते. आषाढी एकादशी या खास योगात साजरी होईल, राशीनुसार करा ‘या’ मंत्राचा जप.

मेष राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला गुळाचे दान करावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही ॐ गोविंदाय नमः मंत्राचा जप करावा.

वृषभ राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला साखर आणि आंब्याचे फळ दान करावे. त्याचबरोबर श्री हरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ॐ पद्मनाभय नमः मंत्राचा जप करावा.

मिथुन राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला हिरवा मूग दान करावा आणि हिरवे वस्त्र परिधान करावे. यासोबतच भगवान विष्णूला तुळशीचे पानही अर्पण करावे. मिथुन राशीच्या लोकांनी ॐ माधवाय नमः या मंत्राचा जप करावा.

कर्क राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला पांढरे धान्य दान करावे. याशिवाय भगवान विष्णूच्या भोगामध्ये पांढरी मिठाई ठेवावी. कर्क राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला ॐ केशवाय नमः मंत्राचा जप करावा.

सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो आणि सूर्य देव भगवान विष्णूचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. देवशयनी एकादशीला केळीच्या झाडावर हळदमिश्रित पाणी अर्पण करावे आणि गूळ व हरभरा डाळ मिसळलेले पीठ गायीला खाऊ घालावे. देवशयनी एकादशीला ॐ हृषिकेशाय नमः या मंत्राचा जप करावा.

कन्या राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला तुळशीला कच्च्या दुधाने पाणी द्यावे आणि संध्याकाळी तुळशीच्या भांड्याखाली तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ॐ श्रीधराय नमः मंत्राचा जप करावा.

तूळ राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला गायीला हिरवा चारा खायला द्यावा. या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ॐ मधुसूदनाय नमः मंत्राचा जप करावा.

वृश्चिक राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला लाल फळांचे दान करावे आणि कोणत्याही गरजूला भोजन द्यावे. या राशीच्या लोकांनी ॐ केशवाय नमः मंत्राचा जप करावा.

धनु राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला मंदिरात जाऊन हिरव्या भाज्या दान कराव्यात आणि एखाद्या भिकाऱ्याला जास्तीत जास्त दान करावे. या राशीच्या लोकांनी ॐ माधवाय नमः या मंत्राचा जप करावा.

मकर राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देवशयनी एकादशीला वैजयंतीच्या फुलांनी त्यांची पूजा करावी. या दिवशी गरजूंना जोडे दान करावेत. या राशीच्या लोकांनी ॐ त्रिविकर्माय नमः मंत्राचा जप करावा.

कुंभ राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला तुळशीच्या मातीने टिळा लावावा आणि भगवान विष्णूच्या पूजेत पिवळे फळ अर्पण करावे. या दिवशी ॐ श्रीधराय नमः मंत्राचा जप करावा.

मीन राशीच्या लोकांच्या जीवनात राहु-केतूमुळे अडचणी खूप वाढू शकतात. तुम्हाला आजार किंवा एखाद्या प्रकारच्या अपघाताला बळी पडावे लागेल. काळजी घ्या तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती यावेळी ठीक नाही. सर्वकाही काळजीपूर्वक करा.