Shravan Somwar २०२३ : पहिला श्रावण सोमवार आजपासून असून १७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. परंतु, या दिवशी काय करतात? तुम्हाला माहितेय का? नाही. काळजी करू नका, आपण आज जाणून घेऊया.
या दिवशी शिवभक्त भक्तीभावाने पूजा करत व्रतही करतात. विवाहित स्त्रियांना हा उपवास केल्याने सुख सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे.
श्रावण सोमवारचे व्रत केल्याने विवाह इच्छुकांच्या लग्नाचा योग लवकरच जुळून येतो अशीही मान्यता आहे. तेव्हा या दिवशी काही खास उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच महादेवाची कृपा लाभेल.
सोमवारी उपवास केल्याने महादेव प्रसन्न तर होतातच शिवाय महादेवाच्या पूजेसह काही खास उपाय केल्याने तुम्हाल फळ प्राप्त होते. श्रावण सोमवारी अवश्य करा हे उपायजर तुम्हाला व्यवसायात यश मिळवायचे असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराला केशरयुक्त दूध अर्पण करा. महादेवाला केशर प्रिय आहे असे म्हटले जाते.
या उपायाने व्यवसायात आणि नोकरीत यश प्राप्त होते. करियरमध्ये यश मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करा. हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो.
आर्थिक समस्यांतून सुटका हवी असेल तर सोमवारी महादेवाला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक त्रासांतून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी महादेवाला चंदनाचा लेप लावा.
हा उपाय केल्याने सर्व त्रासांतून मुक्ती मिळते.महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावण सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. तसेच तुम्ही अन्नदानही करू शकता.