आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाची माहिती

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। राज्यात काही दिवसात पावसाचा जोर वाढला असून राज्यात आजही पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात काल पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला होता.

कोकण, विदर्भासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील ४८ तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. राज्यातल्या पुढील दोन दिवसात २५ आणि २६ सप्टेंबरला राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, भंडारा, गोंदियामध्ये पावसाच्या तुरळक ते मुसळधार सरींची वर्तवली जात आहे. तर नागपूरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.  तर राज्याच्या उर्वरीत ठिकाणी आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच रविवारी ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.