तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। रोहित शर्माचा समतोल, विराट कोहलीचा प्रचंड उत्साह आणि जसप्रीत बुमराहची कलात्मकता यामुळे शनिवारी होणाऱ्या विश्व्चषकाच्या हायव्होल्टेज सामन्यात भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार आहे. तथापि या सामन्याला सामाजिक राजकीय संदर्भ देखील आहे.
जावेद मियांदाद आणि चेतन शर्मा, सलीम मलिक आणि मणिंदर सिंग, अजय जडेजा आणि वकार युनूस, ह्रिषीकेश आणि सकलेन मुश्ताक, सचिन तेंडुलकर, आणि शोएब अखतर विराट कोहली आणि वहाब रियाझ, जोगिंदर शर्मा आणि मिस्बाह उल हक याना विचारा हि स्पर्धा वेदना आणि परमानंद हास्य आणि हृदय विदीर्ण करणाऱ्या उदाहरणांनी भरलेली आहे.
१ लाख ३२ हजार क्षमतेच्या भव्य स्टेडियम मध्ये रोहित शर्माचे सहकारी कशी कामगिरी बजावतात याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. नंतर शुभमन गिल बरा होत असून कोलमबोतील आशिया चषकात पावर प्ले मध्ये अर्धा डझन चौकार मारून त्याने जे केले ते शाहीन बाबलही करायला तयार असेल. जर असे खरोखरच घडले तर पाकिस्तानी संघाचे मनोधैर्य करण्याचे अर्धे काम होईल. फुल शॉट मध्ये निपुण असलेला हा खेळाडू आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करू इच्छित आहे. लोकेश राहुल यासारख्या खेळाडूंसाठी एक मजबूत मंच तयार होईल दर्जेदार फिरकीपटून अभावी पाकिस्तानचा मार्ग अवघड होणार आहे.
भारत पाकिस्तान सामन्याकडे केवळ एक नेहमीसारखा सामना म्हणून नव्हे तर सर्वात मोठा हायव्होल्टेज सामना म्हणूनच पाहतात ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे पाकिस्तानी प्रेक्षक हे या दृष्टिकोनातून या सामन्याकडे पाहतात. त्यामुळे आजच्या या क्रिकेट युद्धाकडे अवघ्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.