आठवड्याच्या शेवटी जळगावकरांना दिलासा! चांदी तब्बल 1600 रुपयांनी घसरली, सोनेही..

जळगाव :  मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढत आहे. सोबतच चांदीनी वाढत आहे. यामुळे  दोन्ही धातूंच्या किमतींनी मोठा उच्चांक गाठला. मात्र आज आठवड्याच्या शेवटची दिवशी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ही मोठी संधी आहे.

जळगाव सुवर्ण नगरीत आज शनिवारी  24 कॅरेट सोन्याचा भाव 60,800 (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 61,500 रुपये रुपये इतका होता. म्हणजेच त्यात 700 रुपयाची घसरण झाली आहे.

काय आहे आजचा चांदीचा दर 
आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी एक किलो चांदीचा भाव 75,900 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 77,500 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात तब्बल 1600 रुपयाची घसरण झाली आहे.