जळगाव | सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असून या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. तर चांदीच्या दरात फारसा बदल दिसून आलेला नाही. जर तुम्हीही आज सोने चांदी खरेदीसाठी बाजारात जाणार असाल तर त्याआधी तपासून घ्या भाव…
दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत काल शनिवारच्या सकाळच्या सत्रापेक्षा सोन्याच्या दरात 300 घसरण दिसून येतेय. तर चांदीचा भाव तब्बल 500 रुपयांनी घसरलेला दिसून येतोय. शनिवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 63,700 रुपयांवर विकला जात होता. मात्र आता 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,400 रुपयांवर पोहोचला आहे. या आठवडाचे बोलायचं झाल्यास आठवड्याभरात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. यापूर्वी सोमवारी (29 जानेवारी) सोन्याचा दर 62,900 इतका होता.
त्यानंतर मंगळवारी सकाळी 100 रुपयाची वाढ होऊन 63000 रुपयांवर गेला. बुधवारी सकाळी त्यात 300 रुपयाची वाढ होऊन 63,300 रुपयांवर पोहोचला, गुरुवारी पुन्हा 100 रुपयाची वाढ होऊन 63,400 झाला, शुक्रवारी 100 रुपयाची घसरण झाल्याने दर 63,300 रुपयांवर आला. मात्र शनिवारी सकाळी दरात पुन्हा 400 रुपयांची वाढ दिसून आली. यामुळे सोन्याचा दर 63,700 रुपयांवर विकला जात होता. मात्र त्यात पुन्हा 300 रुपयापर्यंतची घसरण झाली.
दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी चढ-उतार दिसून आला. सोमवारी (29 जानेवारी) चांदीचा दर 72,500 रुपये प्रति किलो इतका होता. आज रविवारी सकाळी चांदीचा दर विनाजीएसटी 72,500 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. मध्यंतरी चांदीचा 73000 रुपयावर स्थिर होता. मात्र आज त्यात 500 रुपयाची घसरण दिसून आली.