आता आदिवासी विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न होईल पूर्ण; फक्त करा ‘हे’ काम

नंदुरबार : आदिवासी विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षणाचे स्वप्न शिष्यवृत्ती द्वारे पूर्ण होणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग १० विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत असावी. राज्यातील मागासवर्ग गटामध्ये आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक मागासलेले व आर्थिकदृष्ट्या असून, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होतील.

त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी परदेशातील विद्यापीठामध्ये शासन निर्णयात नमूद विविध अभ्यासक्रमासाठी ज्या अनुसूचित जमातीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा १० विद्यार्थ्यांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी (मुला-मुलींनी) अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.