WI vs IND ODI Series : टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 200 धावांनी पराभव करून मालिका 2-1अशी जिंकली, पण विश्वचषकापूर्वी संघाबाबत अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर आजुन तरी सापडले नाहीत.
इशानचा फॉर्म, पण केएल राहुल फिट झाला तर?
इशानची कामगिरी चांगली आहे, पण केएल राहुल फिट असेल तर त्याची फलंदाजी कशी असेल. रोहित शर्मा आपली फलंदाजी इशानसाठी सोडेल, ही शक्यता कमी आहे. मग इशान मधल्या फळीत खेळणार का?
श्रेयस, संजू आणि सूर्या कोण?
श्रेयस अय्यर फिट झाला नाही तर सॅमसन चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. मात्र तो काल मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार यादवही 35 धावा करून बाद झाला आणि वनडेत टी-20 फॉर्म दाखवू शकला नाही. श्रेयस आणि राहुल दोघेही तंदुरुस्त झाले तर त्यांना संघात स्थान मिळवणे कठीण होईल.
युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांचे काय होणार?
गोलंदाजीतही युझवेंद्र चहलला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. आता विश्वचषकापूर्वी भारताला फक्त नऊ सामने खेळायचे आहेत (जर संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला तर). रवींद्र जडेजा ही पहिली पसंती फिरकीपटू आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल यांच्यामुळे मुकेश कुमारला जागा मिळणे कठीण होईल.