मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा बैठकीत अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये रेपो रेट जैसे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच आरबीआयने चेक क्लिअरन्सबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.आरबीआयने बँकांना आता चेक क्लीअर करण्याचा कालावधी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत
आरबीआयने चलनविषयक धोरण बैठकी काही तासांतच चेक सेटलमेंट करण्यास सांगितले आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेंट्रल बँकांना सूचना दिल्या आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता चेक काही तासात स्कॅन, सबमिट आणि पास केला जाईल. त्यामुळे कामाची वेळ कमी होईल. याबाबत गाइडलाइन्स लवकरच जाहीर करण्यात येतील, असं आरबीआयने सांगितले आहे.
चेक क्लिअरन्सच्या प्रोसेसमध्ये सुधारणा आणि त्यातील जोखीम कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांचा चेक क्लिअरन्सचा अनुभव सुधारणे हा यामागचा उद्देश आहे. सध्याच्या चेक ट्रानझॅक्शन सिस्टिममध्ये (CTS)दोन दिवसांमध्ये चेक क्लिअरन्स केले जाते.परंतु ही प्रक्रिया आता लवकर लवकर होणार आहे. ऑन रियलायजेशन-सेटलमेंटसह चेक क्लिअरिंग प्रक्रियेची कार्यक्षमता आणि प्रोसेसमध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सेटलमेंट जोखीम कमी करण्यासाठी हा नियम डिझाइन करण्यात आला आहे.