जळगाव । सलीम कुट्टा याच्याशी संबंध असल्याच्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांची देखील एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे.
खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले. सध्या एकनाथ खडसे हे आता मानसिक तणावात असल्याचे महाजन म्हणाले.
भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही. त्यामुळं वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप केले जात असल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसेंची परिस्थिती वैफल्यग्रस्त झाल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत खडसे बडबड करत असतात असे महाजन म्हणाले.
मात्र आता त्यांची कीव करावी वाटत नसल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसेंमुळं त्यांच्या घरच्या लोकांनाही भोगावे लागले. एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त झाल्याचे महाजन म्हणाले.
दरम्यान, खडसेंनी काही लोकांमुळे भाजप सोडल्याची खंत पुन्हा बोलवून दाखविली. त्यावर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता. तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिले, असं महाजन म्हणाले