आता घरीच बनवा कोबी मंच्युरियन; नोट करा हि रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३।मंच्युरियन जवळपास सगळ्यांनाच आवडत. बाहेर जाऊन मंच्युरियन खाण्यापेक्षा आपण मंच्युरियन घरीच बनवू शकतो. मंच्युरियन घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
कोबी, मैदा, कांदापात, ढोबळी मिरची, गाजर, लाल तिखट,पांढरी मिरी पावडर, गरम मसाला, आल लसूण पेस्ट, लसूण, तेल, मीठ.

कृती
सर्वप्रथम, कोबी, कांदापात, गाजर आणि ढोबळी मिरची बारीक चिरुन घ्यावी. या चिरलेल्या भाज्यांमध्ये मैदा, लाल तिखट, गरम मसाला, पांढरी मिरी पावडर, आल लसूण पेस्ट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे. हे मिश्रण भज्यांप्रमाणे भिजवून घ्यावे गरम तेलात मंच्युरियन तळावेत. तयार आहे मंच्युरियन.