---Advertisement---

आत्मघाती कार बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू

---Advertisement---
नवी दिल्ली : सोमालियातील बेलेडवीन शहरात आत्मघाती कार बॉम्बस्फोटात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. यात २० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बेलेडवीन शहरातील बॉम्बस्फोटात बाजार आणि दोन पेट्रोल पंपांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका मार्केट आणि दोन पेट्रोल स्टेशनजवळ झाला. या स्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सोमालियातील बेलेडवीन येथील बॉम्बस्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात अपघात झाला असून आम्ही जखमींना स्थानिक रुग्णालयात नेत आहोत. तसेच, स्थानिक रुग्णालयात गंभीर जखमींवर उपचार करू शकत नसतील तर आम्ही त्यांना पुढील उपचारासाठी मोगादिशूला विमानाने नेण्याचा प्रयत्न करू, असे एका अधिकाऱ्याने यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर, या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून येथील इमारतींनाही या बॉम्बस्फोटामुळे हानी पोहोचली आहे.
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment