राजस्थानच्या कोटामध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी देशभरातून विद्यार्थी येतात. मात्र कोटामधील आत्महत्येच्या घटना थांबताना दिसत नाहीत. मंगळवारी येथे आणखी एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करत होता. विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्याने हे पाऊल उचलल्याबद्दल वडिलांची माफी मागितली आहे. मृत तरुण हा ढोलपूर येथील रहिवासी आहेत.
कोटा येथे राहून हा विद्यार्थी NEET परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत कोटामध्ये उघडकीस आलेली ही दहावी आत्महत्या आहे. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत राहिल्या तर कोटा कोचिंग सेंटर नावापुरतेच राहील तो दिवस दूर नाही.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोटा शहरात झालेल्या सर्व आत्महत्यांची जबाबदारी कोणत्याही कोचिंग संस्थेने स्वीकारलेली नाही. जबाबदारी घेण्याचा विसर पडल्याने हे विद्यार्थी कोणत्या कोचिंग संस्थेत शिकत आहेत, हेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले नाही.