मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले तर अदिती तटकरे यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली. यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने टीका केली जात होती. आता राष्ट्रवादी सोबत आल्याने अदिती तटकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.
कोणी शपथ घेतली?
अजित पवार – उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
हसन मुश्रीफ – मंत्री
दिलीप वळसे पाटील – मंत्री
धनंजय मुंडे – मंत्री
अदिती तटकरे – मंत्री
अनिल भाईदास पाटील – मंत्री
बाबुराव अत्राम – मंत्री
संजय बनसोडे – मंत्री