तरुण भारत लाईव्ह । ६ सप्टेंबर २०२३। भारताची पहिली सौरमोहीम असलेल्या आदित्य- एल १ ने मंगळवारी पहाटे यशस्वीरीत्या दुसरी कक्षा पूर्ण केली. बंगरूळच्या इस्रो टेलिमेटरी ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क द्वारे हि कामगिरी पार पाडण्यात आता सद्या आदित्य एल १ पृथ्वीपासून २८२ किमी ४०,२२५ किमी अंतरावर असून त्याची पुढील कक्षावृद्धी १० सप्टेंबर रोजी नियोजीत केली आहे. इस्रोने याबाबत माहिती दिली.
श्रेहरीकोटा येथून २ सप्टेंबर ला प्रक्षेपित झालेल्या आदित्य एल १ ने ३ सप्टेंबरला पहिली कक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. आदित्य एल १ सोळा दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार असून या कालावधीत पाच कक्षा पूर्ण करून लग्रेज पॉईंट एल१ च्या दिशेने मार्गस्थ होईल. १२७ दिवसांच्या प्रवासानंतर तो एल १ पॉईंटच्या कक्षेत पोहोचणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील म्हणजेच फोटोस्फिअरचे तापमान ५, ५०० अंश सेल्सियसपर्यंत असते. तेथून पृथ्वीपर्यंत येण्यास ८ मिनिटे २० सेकंदाचा कालावधी लागतो.