आदिवासी पावरा समाजाने अनिष्ठ रूढींना तिलांजली दयावी; वार्षिक सहविचार सभेत मान्यवरांचा सुर

धडगाव : आदिवासी पावरा समाज विचार मंच धडगांव येथे झालेल्या वार्षिक सहविचार सभेत आदिवासी पावरा समाजाने आपल्या उदात्त अशा संस्कृतीचे जतन करीत असतांनाच समाजासाठी घातक असलेल्या अनिष्ठ रुढी परंपरांना तिलांजली दिली पाहिजे असा सुरू उमटला. यावेळी समाजासाठी घातक ठरणाऱ्या विविध पंचवीस ठराव सर्वसहमतीने पारीत करण्यात आले,

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हारसिंग पावरा हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पावरा बारेला मंडळाचे नामदेव पटले, निवृत्त अभियंता झेलसिंग पावरा, विजयाताई पावरा, प.सं. सदस्य सबीबाई पावरा, अॅड. अभिजित वसावे, बिरसा फार्टर्सचे सुशिलकुमार पावरा, बहादुरसिंग गुरूजी, फेंदा पावरा, प्रा.केशव पावरा, अॅड. गोमाता पाडवी, प. सं. सदस्य रोशनी पावरा , आग्रेशा पावरा, शंकर पावरा, बटेसिंग पावरा, विजय पावरा, विविध गावाचे पोलिस पाटील,गावपंच उपस्थित होते.

येथील जुने तहसिल कार्यालय येथून याहा मोगी व राणी काजल मातेच्या पुजनाने आदिवासी पारंपारीक सांस्कृतिक रॅलीला सुरूवात करण्यात आली. नंतर रॅली सभामंडपात दाखल झाल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आदिवासी पावरा समाज विचार मंचाचे अध्यक्ष धनसिंग पावरा यांनी विविध ठराव मांडले त्याला उपस्थितांनी हात उंचावून टाळ्यांच्या गडगडाहाटात संमती दिली. यावेळी विवाह संबंधी, मयत विधीसंबंधी, उत्तरकार्यसंबंधी, इंदल संबंधी, आदिवासी संस्कृती संबंधी विविध अनेक ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले.

आदिवासी पावरा समाज विचार मंचाच्या वार्षिक सहविचार करण्यात आलेले काही महत्वाचे ठराव पावरा समाजाता बाल विवाहला प्रतिबंध, डाकीण संकल्पना समाजातुन हद्दपार करावी., वधु पक्षला दिली जाणार सम्मान राशी सर्व ठिकाणी पंधरा हजार एकोण पन्नास रूपये ऐवढीच राहील., विवाह कार्यक्रमामध्ये भेंडी देणे पुर्णपणे बंद करणे, कोणत्याही कार्यक्रमात खातीरदारी म्हणुन विड्या, तंबाखु, सिगारेट, यांचा होणारा वापर बंद करण्यात यावा., आदिवासी पावरा समाजात कोणताही कार्यक्रम म्हटला म्हणजे दारूशिवाय पुर्ण होत नाही तो आता पुजेपुरताच वापर करावा., लग्नात पारंपारीक वाद्याचाच वापर करावा, बँड अथवा डि.जे.वाजाविण्यावर पुर्ण बंदी करण्यात आली आहे.,
उत्तरकार्यात साधे जेवण देण्यात यावे.बकऱ्याचे मटण देण्याची प्रथा बंद करावी.,मयत विधी व उत्तरकार्य विधित अती होणाऱ्या खर्चा वर आळा घालावा. कमी कमीत खर्चात

विधी पार पाडावी, इंदल कार्यक्रमांत बकरे भेट देऊ नये


आदिवासी संस्कृतीतील महत्त्वाचे सण उत्सव जसे बाबदेव ( वाघदेव ), निपली, नवाय, इंदल, गुवाणपुजन, खेतवालुपुजन,होळी अशा प्रवित्र सणांचे पावित्र्य अबाधित ठेवावे. येणाऱ्या पिढीला त्याची माहिती द्यावी. या सणांमध्ये पारंपारीक आदिवासी पोशाख परीधान करावा, आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे. यासह महत्वाचे ठराव सर्वानुमते पार करण्यात आले . त्यात विविह संबंधीचे २५, मयत व उत्तर कार्यविधीसंबंधी १३, इदल संबंधी३ आणि आदिवासी पारंपारीक संस्कृती संबंधी ८ असे ठराव पारीत करण्यात आले.

पारीत झालेले सर्व ठरावाच्या प्रती प्रत्येक गावाच्या पोलिस पाटीलांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावात एक सर्वसमावेशक समिती तयार करून समितीने गावात बैठक घेऊन ठरावाचे वाचन करावे व त्याच्या अंमजलबजावणीची जबाबदारी घेण्याचे ठरविण्यात आले. एक एक ठरावाचे वाचन राजु पावरा व के.के. पावरा यांनी केले. त्या ठरावाचे विश्लेषण समाजाचे अध्यक्ष धनसिंग पावरा यांनी करून ते ठराव उपस्थितासमोर मांडून त्याची लोकशाही पद्धतीने मंजुरी घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय पावरा, सुकदेव पावरा. सुकलाल पावरा, दिलवरसिंग पावरा, बबन पावरा, बेटेसिंग पावरा. राजु अर्जुन पावरा, कल्याणसिंग पावरा, लखन पावरा, चेतन पावरा , रवि पावरा, राकेश पावरा, बळीराम पावरा, मंगेश पावरा यांच्यासह असंख्य स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचालन राजु पावरा ,के.के. पावरा,दिलेवर पावरा यांनी तर आभार सुकदेव पावरा यांनी मानले.