नंदुरबार : पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध नोंदवलला. दरम्यान, या नंतर जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट पसरलेली आहे.
नवापूर तालुक्यातील मजूर महिलेवर पिंपळनेर येथे अत्याचार केल्याची घटना होती. या घटनेच्या निषेधार्थ १ रोजी नवापूर तालुका कडकड्यात बंद ठेवण्यात आला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध व्यक्त करत ‘आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचार सहन करता येणार नाही. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना कडक शासन व्हावे. महिलेला माता, भगिनी आणि लक्ष्मी दुर्गेचे रूप मानले गेलेले आहे. महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसावा यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात’ अशी मागणी केली.