धरणगाव : शालेय जीवनात शालेय शिक्षण व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून शिकत असतो याची अनुभूती येथील पि. आर. हायस्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी घेतली सुमारे दोनशे स्काऊट आणि गाइड यांनी उघड्यावर स्वयंपाक करण्याची परीक्षा दिली खुल्या मैदानावर आहे. त्या उपलब्ध साधनांवर विद्यार्थ्यांनी स्वयंपाक केला आणि निवासासाठी तंबू ची सजावट केली “आधी हाताले चटके मग मिळती भाकर” या कवियात्री बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा सार, स्वानुभव निसर्ग निवास शिबिरात समजून घेतला.
विद्यालयातील स्काऊट गाईड विभागाच्या वतीने दरवर्षी निसर्ग निवास शिबिर घेतले जाते यावेळी म्हंकाले शिवारात तंबू उभारून दहावीच्या विद्यार्थ्यां साठी एक दिवसाचे शिबिर घेण्यात आले यात मूल्य संस्कार,कौटबिक ,सामाजिक कामातील योगदानाबद्दल शिकवण देण्यात आली तंबू उभारताना वापरण्यात येणारे साहित्य ,गाठींचा वापर,चूल,सांडपाण्याची व्यवस्था, प्रथोपचार,विविध गझेट्स ,नैसर्गिक पान फुलांचा वापर आदींचे प्रत्यशिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले मुला मुलींनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला स्वतः स्वयंपाक करून भोजनाचा आस्वाद घेतला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी स्वनुभवाची पर्वणीच ठरला आहे.
शिबिराचे उद्घाटन मुख्यध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, स्काऊटचे सहायक जिल्हा आयुक्त डी.एस. पाटील उपमुख्याध्यापक डॉ. आशा शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात पी जी पाटील,जी आर सूर्यवंशी यांचे स्काऊट तर डॉ वैशाली गालापुरे, वंदना सोनवणे, आशा शिरसाठ, सुरेखा तावडे यांचे गाईड पथकांचा समावेश होता. सर्व पथकांनी तंबुची सजावट निसर्गतः उपलब्ध पाने,फुले,दगड , गोटे,यांच्या साह्याने केलेली होती स्वतः बनवलेली भरीत भाकरी,मिरची ठेचा, कोशंबिर,पातोड्या भाजी ,कळण्याची भाकरी ,जिरा राइस,गाजर हलवा, चना मसाला आदी पदार्थांची दिवसभर चर्चा सुरू होती स्वयंपाकाची देणं मुलींना असते काही मुली तर सुगरण आहेत हे या शिबिरातून सिद्ध झाल्याच्या भावना भेट देणाऱ्यानी व्यक्त केल्या.
शिबिरातून मिळाली प्रेरणा
बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आव्हाने पेलता यावीत उघड्यावर स्वयंपाकाच्या स्वानुभवातून आत्मविश्वास वाढला अनेक पथके असल्याने आपल्या पाक कृतीला आव्हान समजून आधिकं चांगले करण्याचा प्रयत्न केला सांघिक भावना आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आम्ही यशस्वी झालो भविष्यात सामाजिक कार्यासाठी हे शिबिर आम्हाला. मार्गदर्शक आणि आठवणीतील राहील अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
शिबिराला डॉ बापू शिरसाठ, वसंतराव चौधरी प्रदीप असोदेकार, नंदू पाटील,महेश पाठक ,सुरेंद्र सोनार यांच्यासह,स्काऊट गाईड चे ही शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट देऊन तंबू ची पाहणी केली. शिबिर यशस्वीतेसाठी स्काऊट गाईड विभाग प्रमुख पी जी पाटील ,सौ वंदना सोनवणे यांच्यासह ईशा परीहर,दामिनी माळी,लीना भोई यांच्या संघाने परिश्रम घेतले.