---Advertisement---
भुसावळ । प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्ष्यात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना-बरौनी दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला भुसावळ, जळगाव स्थानकांवर थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली.
ट्रेन क्रमांक ०९०३७ उधना-बरौनी जं. ही विशेष गाडी उधना येथून दर शुक्रवारी सकाळी 08.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.00 वाजता बरौनी जंक्शनला पोहोचेल. ही ट्रेन 23 फेब्रुवारी ते 29 मार्च 2024 पर्यंत धावणार आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09038 बरौनी-उधना स्पेशल ट्रेन दर शनिवारी सायंकाळी 17.00 वाजता बरौनी जंक्शन येथून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी उधना येथे रात्री 22.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 24 फेब्रुवारी ते 30 मार्च 2024 पर्यंत धावणार आहे.या ट्रेनला स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लासचे डबे असतील. ट्रेन क्रमांक 09037 साठी बुकिंग आज म्हणजेच 21 फेब्रुवारी 2024 पासून सर्व PRS काउंटरवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.
या स्थानकांवर असेल थांबा
ही गाडी नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी जंक्शन, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि पाटणा जं. स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल.
---Advertisement---