Indian Railway Rule : रेल्वे प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरंतर भारतात रेल्वेचा वापर सर्वाधिक केला जातो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वेला अभूतपूर्व असे स्थान मिळाले आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे कानाकोपऱ्यात विस्तारले आहे.
रेल्वेचा प्रवास स्वस्तात आणि सुरक्षित असल्याने सर्वच जण रेल्वेच्या प्रवासाला पसंती दाखवतात. मात्र असे असले तरी रेल्वेचे असे काही नियम आहेत जे अजूनही अनेक प्रवाशांना माहिती नाहीयेत. रेल्वेने अशा काही सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत ज्या सोयी-सुविधांबाबत देखील अद्याप अनेक रेल्वे प्रवाशांना अपेक्षित अशी माहिती नसल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय रेल्वेने अशी एक योजना सुरू केली आहे ज्या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवाशांना एका तिकिटावर तब्बल 56 दिवसांपर्यंत प्रवास करता येऊ शकतो. जर तुम्हाला देखील या योजनेबाबत माहिती नसेल आणि तुम्हाला एका तिकिटावर 56 दिवस प्रवास कसा करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
रेल्वे प्रशासनाने सर्कुलर जर्नी तिकिटाची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे नियोजित स्थळी प्रवासाला निघाल्यावर जर, मध्येच कुठे तीर्थस्थळ किंवा पर्यटन स्थळ असेल, तर त्या ठिकाणीदेखील प्रवाशांना उतरता येणार आहे. दरम्यान, या तिकिटामुळे प्रवाशाला संबंधित यात्रोत्सवाच्या मार्गातील कुठल्याही आठ स्टेशनवर उतरून पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे, विशेष म्हणजे ही सुविधा एकाच तिकीटावर उपलब्ध आहे. रेल्वे बोडनि डेक्कन ओडीसी, पैलेस ऑन व्हील्स, महाराजा एक्स्प्रेस आदी आलिशान ट्रेन सुरू करून, प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातच आता एकत्र परिवारासह पर्यटन किंवा धार्मिक तीर्थस्थळी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्कुलर जर्नी तिकिटाची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाला तिकीट खिडकीवर तिकीट न काढता, स्टेशन प्रबंधक यांच्याकडे जाऊन एका विशिष्ट फॉर्ममध्ये कुठून-कुठपर्यंत प्रवास करणार, प्रवाशांची संख्या, कुठल्या स्टेशनवर उतरणार आदी माहिती फॉर्ममध्ये भरून द्यावी लागणार आहे. त्यानंतर वाणिज्य विभागातर्फे रेल्वेच्या नियमाप्रमाणे तिकीट दर आकारून, त्या प्रवाशाचे सर्कुलर जनीं तिकीट तयार केले जाईल.
असे करा नियोजन
सर्कुलर जर्नी तिकिटाच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना किमान आठवडाभर आधी आपल्या प्रवाशाचे नियोजन करुन तिकीट बूक करावे लागणार आहे. त्याच प्रमाणे, आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये प्रवाशांना आपले बुकींग करता येणार आहे.
तिकिटाची मुदत ५६ दिवस
या तिकिटाची मुदत ५६ दिवस राहणार असून, किमान आठ स्टेशनवर प्रवाशाला थांबता येणार आहे. विशेष म्हणजे ज्या स्टेशनवरून प्रवासी चढेल, त्याच स्टेशनवर प्रवाशाला यात्रेचा समारोप करावा लागणार आहे.
यात्रोत्सवासाठी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना सर्कुलर जर्नी तिकिटाची सुविधा अत्यंत सोयीची आहे. यामध्ये प्रवाशाला एकाच तिकिटावर प्रवास करता येणार असल्याने, किमान आठ स्टेशनवर उतरून त्या शहरातील पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
-डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई