भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. या निवडीनंतर बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
बजरंग पुनिया यांनी त्यांचा पद्मश्री पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठेवला होता आणि पत्रही लिहिले होते. यानंतर सरकारकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कुस्तीगीरांची मागणी लक्षात घेऊन सरकारने आता नव्या कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे.
दरम्यान, तिची लढाई सरकारशी नाही तर एका व्यक्तीशी आहे, असे साक्षी मलिक व्यक्त केले आहे.