---Advertisement---

आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाआधी ‘हा’ निर्णय घ्यावा लागेल!

---Advertisement---

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे यावर निर्णय कधी? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल, असं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?
सर्वोच्च न्यायालयानं निश्चितपणे लवकरात लवकर हा निर्णय घ्यायला सांगितला आहे. या निर्णयापूर्वी काय-काय प्रक्रिया करावी लागणार आहे, हे पाहावं लागेल. सर्वात आधी मूळ राजकीय पक्ष कोणता? उद्धव ठाकरेंचा गट की एकनाथ शिंदेंचा गट? या दोन्हींपैकी कोणाचा पक्ष खरा आहे. हा निर्णय आधी घ्यावा लागेल. हा निर्णय घेताना दोन्ही बाजूंचं मत ऐकून घ्यावं लागेल. त्यानंतर हा निर्णय घेतल्यानंतर ज्या पक्षाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देतो. त्याच पक्षाचा व्हिप अधिकृत मानला जातो. यानंतर प्रत्येक याचिकेनंतर आपल्याला सुनावणी घ्यावी लागेल. 54 आमदारांबाबत याचिका दाखल आहेत. त्यांच्या बाजू ऐकून निर्णय घ्यावा लागेल.

हा निर्णय आपण लवकरात लवकर घेऊ, हा निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई आपण करणार नाही, असंही राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले. भरत गोगावले, एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड सर्वोच्च न्यायालयानं बेकायदा ठरवलं आहे, ते कोणत्या कारणास्तव केलंय, तर राजकीय पक्षाची इच्छा होती का? या दोघांना त्या-त्या पदावर नेमण्याची? यामुळे कोर्टानं दोघांचीही निवड बेकायदा ठरवली आहे. पण कोर्टानं असं सांगितलेलं नाही की, कायमस्वरुपी भरत गोगावलेंची निवड बेकायदा आहे. कोर्टानं सांगितलंय की आधी राजकीय पक्ष कोण आहे, याची खातरजमा करा, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment