मुंबई : विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज पार पडली. यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३४ याचिका असून आजच्या सुनावणीनंतर या याचिकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेळापत्रकानुसार सुनावणी कशी होणार, सुनावणीची रुपरेषा कशी असेल या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. दरम्यान, आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या सुनावणीला ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू उपस्थित होते.
आजच्या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. तर ठाकरे गटाच्या या युक्तीवादावर शिंदे गटाकडून विरोध दर्शवण्यात आला. याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यास शिंदे गटाचे वकील अनील साखरे यांनी विरोध केला.