आमदार चिमणराव पाटलांच्या प्रयत्नांना यश; रस्ता सुधारणेसाठी २९० कोटी रुपयांना मंजुरी

पारोळा : तालुक्यातील आज पावेतो प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण मार्ग यांचेसह शेतरस्त्यांचा कामांना देखील आ. चिमणराव पाटील यांनी प्राधान्य देऊन रस्त्यांचा सुधारणेसाठी पाठपुरावा केला आहे. यात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांचा सुधारणेसाठी ३५० कोटींपेक्षा जास्तचा निधी आमदार चिमणराव पाटील यांनी योग्य त्या पाठपुराव्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी खेचून आणला आहे. यात प्रामुख्याने दोन गावांना जोडणारे पूल असतील, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहाखाली येणारे लहान मोठे पूल असतील, मुख्य रस्ते, गावांना जोडणारे रस्ते यांसह अनेक लोकाभिमुख कामांना आमदार चिमणराव पाटील यांचा पाठपुराव्याने मंजुरीसह निधी प्राप्त झाला आहे.

त्यातील बरीचशी कामे पूर्णत्वास आली, काही कामे सुरु आहेत, तर काही कामे तांत्रिक मान्यतेसाठी शासन दरबारी प्रस्तावित आहेत. स्वातंत्र्य काळापासून ज्या रस्त्यांवर साधी माती देखील पडली नाही अशा रस्त्यांवर आज डांबरीकरण, काँक्रीटीकरण होत आहे. नागरिकांचे दैनंदिन दळणवळण रस्त्यांअभावी गैरसोयीचे होवू नये, रस्त्यांची कामे झाल्यास नागरिकांचा, शेतकऱ्यांचा दैनंदिन दळणवळण असेल, अत्यावश्यक आरोग्य विषयीची वाहतूक असेल यांना देखील मोठा फायदा होत असतो. त्यामुळे मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरावस्था ही बदलावी व दैनंदिन प्रवास हा सुखकर व्हावा ही आमदार चिमणराव पाटील यांची संकल्पना आहे. आजवर आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात आणलेला निधीतून प्रथम प्राधान्य हे रस्त्यांचा कामांना दिले आहे.

सद्यस्थितीला मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यातच आमदार चिमणराव पाटील यांनी मोठी भर म्हणून पारोळा ते कजगांव ते भडगांव रस्त्याचा सुधारणेसाठी निधी खेचून आणला आहे. पारोळा-कजगांव-भडगांव रोड तसा अनेक दशकांपासून दुरावस्थेमुळे चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना फार जोखीमेने वाहन हाताळावे लागत होते. हा रस्ता जणू खड्यांचे माहेर घर झाल्यासारखे होता. अनेक दा या रस्त्याचा सुधारणेसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी पाठपुरावा करून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु अपूर्ण निधी, निधी कमतरता त्यामुळे ह्या रस्त्याचा पूर्ण विकास होवू शकला नाही. म्हणून आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने ह्या रस्त्याचा सुधारणेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होते.

अखेर या पाठपुराव्याला यश आले असून शासनाच्या ए.डी.बी.(Asian Development Bank) अंतर्गत पारोळा ते कजगांव ते भडगांव रस्त्याचा सुधारणेसाठी २९० कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे या संपूर्ण रस्त्याचा पूर्णपणे कायापालट होऊन, या कामांत रस्त्याचे १० मीटर रुंदीकरण, डांबरीकरण, मजबुतीकरण, काँक्रीटीकरण या कामांचा समावेश आहे. यामुळे दळणवळणासाठी मोठी मदत होणार असून ह्या रस्त्याचा सुधारणेसाठीची प्रतीक्षा आता संपली आहे.