विशाल महाजन
पारोळा : आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करून अधिकाधिक निधी मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजवर त्यांच्या दूरदृष्टी व पाठपुराव्याने मतदार संघात सुमारे १५०० कोटींची कामे सुरु आहेत. अशातच एरंडोल विधानसभा मतदार संघातील रस्ते, पुलांच्या कामासाठी ४० कोटी मंजूर झाले आहेत.
यात मतदार संघातील रस्ते, पूल, गावांमधील मुलभूत सुविधेची कामे यांसह अनेक विधायक कामांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने ज्या गावांचा पाऊस, वारा, वादळ असतांना पूर्णपणे संपर्क तुटायचा अशा गावांना थेट तालुक्याशी व मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम आमदार चिमणराव पाटील हे करत आहेत.
यात मोंढाळे पिंप्री, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, लोणीसीम, मोंढाळे प्र.अ., एरंडोल ते पुरा या गावांना जोडण्यासाठी मोठ्या पुलांना मंजुरी आणली आहे. पारोळा व एरंडोल शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. तर आज पुरवणी अर्थसंकल्पातून तब्बल ४० कोटी ४८ लाखाचा निधी मिळाला आहे.