तळोदा : तालुक्यातील अनिकेत या तरुणाचा अपघातात एक पाय निकामी झाल्याने आमदार राजेश पाडवी यांनी मदतीचा हात दिला. मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये कृत्रिम पाय यशस्वीरित्या बसविण्यात आला. यामुळे अनिकेतला दोन्ही पायांवर चालणे शक्य झाले आहे.
शहादा-तळोदा मतदार संघात आमदार राजेश पाडवी यांनी नेहमीच रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविल्या आहेत. अशातच तालुक्यातील अनिकेत या तरुणाचा अपघातात एक पाय निकामी झाला होता. याबाबत आमदार पाडवी यांना सांगण्यात आले. त्यांनी तात्काळ मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये अनिकेत यांना कृत्रिम पाय बसवण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. आज त्यांना आ. पाडवी यांच्या प्रयत्नाने कृत्रिम पाय यशस्वीरित्या बसविण्यात आला. यामुळे अनिकेतला दोन्ही पायांवर चालणे शक्य झाले आहे.
आ.पाडवी व कलावती फाऊंडेशन यांच्या माध्यमातून तळोदा-शहादा मतदार संघासाठी पाच रुग्णवाहिका जनतेची निशुल्क सेवा करीत आहेत. आ. पाडवी सातत्याने म्हणतात की, मतदार संघातील जनतेला वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही मदत लागली तर आमदार तत्पर आहेत आणि आरोग्य सेवेचा हा यज्ञ अविरतपणे धगधगता ठेवला आहे. आमदार कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, मतदारसंघातील हॉस्पिटल व वैद्यकीय संदर्भात कोणतीही मदत हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन स्विय सहाय्यक ऍड.दीपक जयस्वाल (मो.८३८०९११०२८) यांनी केले आहे.