जळगाव तरुण भारत लाईव्ह । ११ डिसेंबर २०२२ । मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज रविवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार खडसे व महाजन गटात जोरदार चुरस दिसून येत आहे. दरम्यान भाजपाचे आमदार संजय सावकारे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छायाताई देवकर यांच्यासह प्रमुख उमेदवारांनी दूध संघात एंट्री केली आहे.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू असलेले अरविंद देशमुख हे विजयी झाले आहे. ते ९० मतांनी विजयी झाले. तर दुसरीकडे भुसावळ मतदार संघातील भाजपचे आमदार संजय सावकारे ७६ मतांनी विजयी झाले आहे. महिला राखीवमधून शेतकरी विकास पॅनलच्या पूनम प्रशांत पाटील आणि छायाताई गुलाबराव देवकर यांचा विजय झाला आहे. ओबीसी मतदार संघातून खडसे गटाचे पराग मोरे विजयी झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगलेच तापले गेलं होते. यावरून आरोप-प्रत्यारोप होत होती. शनिवारी १९ जागांसाठी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रावर ४४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा दूध संघाच्या मतदानात १०० टक्के मतदान झाले आहे. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.