अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या याचिकेवर आज (10 एप्रिल) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्ते संदीप कुमार यांच्या वकिलाने सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की याआधीच्या दोन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत, परंतु अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतरही ते मुख्यमंत्रीपदावर राहू शकत नाहीत. ज्यावर न्यायालयाने म्हटले की, न्यायालयाने कधी मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवले आहे का ?
न्यायालयाच्या प्रश्नावर याचिकाकर्त्याच्या वकिलाने होय, असेच उत्तर दिले. त्यावर न्यायालयाने म्हटले की, न्यायालयाने एका मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे, तो निकाल तुम्ही दाखवा. याचिकाकर्त्याच्या वकिलाने मागील एका प्रकरणाचा हवाला दिला. हे प्रकरण जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, हे अपात्रतेचे प्रकरण आहे.