आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेली अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे. आज आझाद मैदानावर हा आझाद असा मेळावा होतोय असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सावरकरांचा अपमान ज्यांनी केला तो मणिशंकर अय्यर याला बाळासाहेबांनी जोडे मारण्याचे काम केलं आणि त्याच काँग्रेसचे जोडे आज हे लोक उचलत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले.
त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले.