BJP and Shivsena: कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध दर्शवत बेदम मारहाण केल्याची घटना घडली, समोर आली आहे. या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजपा कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. या दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केला आणि तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे. यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. भाजप शहर अध्यक्षासह कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.