मणिपूरमध्ये भारत म्यानमार सीमारेषेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यांनतर त्यांने स्वतःला गोळी मारून ठार केले. यात सहा जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
या गोळीबाराचा संबंध सध्या मणिपूरात सुरु असलेल्या जातीय दंगलीशी नसल्याचे आसाम रायफल्स कडून सांगण्यात आले आहे. बुधवारी सकाळी भारत म्यानमार सीमारेषेजवळ आसाम रायफल्स बटालीयनमध्ये घडली आहे.