Crime News : पुण्यात एका इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. हत्या करणाऱ्या प्रियकराचा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून ही हत्या केल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली आहे.
हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसापासून तिच्या मित्रासोबतसुपर एका लॉज मध्ये वास्तव्यास होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. वंदनावर बंदुकीतून गोळीबार करून तिची हत्या करणारा तरुण हा पसार झाला असून हिंजवडी पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.
साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलीची ओयो हॉटेलमध्ये गोळ्या घालून हत्या केली आहे. लखनऊ वरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. त्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.