इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धा; नंदुरबारचे करणसिंग चव्हाण सांभाळणार भारतीय संघाची धुरा !

नंदुरबार : नेपाळ येथे 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचे स्पोर्ट शिक्षक करणसिंग चव्हाण हे भारत देशाकडून इंटरनॅशनल बॉक्स लंगडी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. चव्हाण यांची नियुक्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी मारुती हजारे यांनी निवड केली.

विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी , माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्यात सुवर्णपदक विजेते ठरलेला नंदुरबार,सांगली , नागपूर, ठाणे जिल्ह्यातील बॉक्स लंगडी चे खेळाडूंनी देश पातळीवर पंजाब या ठिकाणी महाराष्ट्राचे नेतृत्व करताना कोच म्हणून चव्हाण यांचीच नियुक्ती केली होती आणि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवल्याने इंडिया फेडरेशनचे सेक्रेटरी मारुती हजारे यांनी पुन्हा करणसिंग चव्हाण यांची इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. माझ्यावर दाखविलेला विश्वास हा निश्चित मी सार्थ करून दाखवीन असे चव्हाण यांनी प्रतिपादन केले.

या निवडीबद्दल बॉक्स लंगडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष इंद्रजीत सिंग राठोड व सचिव आशिष सावंत तसेच नंदुरबार जिल्ह्यातील एका क्रीडा शिक्षकाची प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.