बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. विशेष म्हणजेच पदवी पास असलेल्या उमेदवारांना मोठी संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावीत.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ५५० जागा भरल्या जाणार आहे. अप्रेंटिस पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला बँकेच्या कामाबाबत सर्व काही शिकवण्यात येणार आहे. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहेत त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीआधी अर्ज करावेत.
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५,००० रुपये स्टायपेंड देणार आहे. नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ९४४ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.https://www.iob.in/ या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.