इराण-इस्रायल युद्धानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय, तेल अवीवला जाणारी विमानसेवा स्थगित

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत तेल अवीवची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. वृत्तानुसार, टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपन्यांनी तेल अवीवला जाणारी आणि तेथून जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाने X वर ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘मध्यपूर्वेतील देशात उद्भवणारी परिस्थिती पाहता, तेल अवीवमधून आमची उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत स्थगित राहतील.’